गृहखरेदीचे स्वप्न असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी - 'दुसरी दिवाळी - व्हीटीपी वाली २०२४' ! - Maharashtra Times

  • VTP blog datePrerendered

नात्यांमधील गोडवा जपणारा, संस्कृती आणि परंपरा यांचा अविभाज्य भाग असणारा, जीवन प्रकाशमय करणारा - सर्वांचा आवडता सण म्हणजे दिवाळी ! मात्र यावर्षीची हि दिवाळी जरी एका अर्थाने संपली असली तरी अजूनही एका विशेष कारणामुळे सर्वांमध्ये एक विलक्षण उत्साह आणि उत्सुकता दिसून येत आहे. पुण्याच्या क्षितिजावर पुन्हा एकदा चैतन्यमयी वातावरण निर्माण करणारे हे विशेष कारण म्हणजे - 'दुसरी दिवाळी - व्हीटीपी वाली २०२४' ! ग्राहकाभिमुख म्हणून लौकिक असणारे व्हीटीपी रिअलटी यांचा प्रत्येक उपक्रम हा आजवर त्यांची वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे दिसून येते. आणि म्हणूनच गृह खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी, ते स्वप्न साकार करण्याची नामी संधी गेली काही वर्ष सातत्याने व्हीटीपी रिअलटी घेऊन येत आहेत. यंदाचे या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष असून, 'दुसरी दिवाळी -व्हीटीपी वाली' हा खऱ्या अर्थाने एका गृहखरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वांसाठी एक वैशिट्यपूर्ण 'सण'च आहे असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

मुख्य सणाच्या काळात असणारी धांदल-धावपळ लक्षात घेता अनेकदा प्रत्यक्ष खरेदीसाठी इच्छा असूनदेखील ग्राहकांना हवा तसा निवांत वेळ मिळत नाही. शिवाय यामुळे त्यांच्या साठी असणाऱ्या योजना, सवलती यांचा योग्य लाभ त्यांना घेता येत नाही आणि या दरम्यानच दिवाळी आणि त्या निमित्त असणाऱ्या विशेष योजना एकत्रित रित्या संपुष्टात येतात. अर्थातच गृहखरेदीचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सर्व ग्राहकांची हि अडचण व्हीटीपी रिअलटी ने अचूक ओळखली आणि त्यांच्यासाठी आपले स्वप्न सत्यात उत्तरवण्याची अनोखी संकल्पना सादर केली. संपूर्ण कुटुंबाला एकत्रित रित्या, निवांतपणे आपल्याला हवे तसे घर निवडता यावे, पाहता यावे, या हेतूने सुरु झालेला हा उत्सव आज सातत्यपूर्ण पद्धतीने सुरु असल्यामुळे, खऱ्या अर्थाने एक समृद्ध 'परंपरा' ठरताना दिसून येत आहे. 'फिक्स्ड प्राईज' या वैशिष्ट्यासाठी ओळखले जाणारे व्हीटीपी रिअलटी हे या 'दुसऱ्या दिवाळी' दरम्यान भरघोस सवलती, आकर्षक भेटवस्तू, विशेष योजना ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत असल्याने 'या' 'सणा'ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असल्याचे जाणवते. शिवाय, 'गृह विक्री' एवढाच केवळ हेतू न ठेवता, ग्राहकांना अधिकाधिक लाभ मिळावा त्यांच्या आयुष्यातील हे सोनेरी स्वप्न लवकरात लवकर साध्य व्हावे या दृष्टीने प्रयत्नशील असणाऱ्या व्हीटीपी रिअल्टीचे त्यांच्या ग्राहकांशी असलेले नाते आणखी दृढ होत असल्याचे स्पष्ट होते.

'दुसरी दिवाळी - व्हीटीपी वाली' या संदर्भात बोलताना व्हीटीपी रिअलटी चे सीईओ आणि एक्सएक्युटीव्ह डायरेक्टर सचिन भंडारी सांगतात ' प्रत्येक घराची एक गोष्ट असते. या उपक्रमाच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांचा हा स्वप्नवत प्रवास - सुखकर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. केवळ घराचे बांधकाम करून त्याची विक्री करण्यापेक्षा, आमच्या ग्राहकांच्या शाश्वत आनंदाचे, सुखाचे, समाधानाचे नंदनवन फुलवणारी एक अद्वितीय वास्तू निर्माण करण्याकडे आमचा आग्रह अधिक असतो. या हेतूनेच आजवर काम करत असल्यामुळे ग्राहकांच्या मनात व्हीटीपी रिअल्टी संदर्भात एक विशेष प्रेम आणि आदर आम्हाला नेहेमी दिसून येतो आणि खऱ्या अर्थाने हे समाधान आमच्या साठी अनमोल आहे.

बांधकाम क्षेत्रातील अग्रणी - व्हीटीपी रिअल्टी

गेल्या अडतीस वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात आपल्या उत्तमोत्तम प्रकल्पांच्या माध्यमातून विशेष सुप्रसिद्ध असणारे एक प्रमुख नाव म्हणजे व्हीटीपी रिअल्टी. योजनाबद्ध कार्यशैली, गुणवत्तापूर्ण बांधकाम, सृजनात्मक डिझाइन्स, आधुनिक तंत्रज्ञानाच सुयोग्य वापर, अद्ययावत सोयी सुविधा, पारदर्शी व्यवहार या साऱ्यामुळे व्हीटीपी रिअल्टी हे आता केवळ पुण्यातीलच नव्हे तर देशपातळीवर देखील एक अग्रणी नाव ठरत आहे. 'बेटर डिझाईन, बेटर बिल्ड, बेटर केअर' या ध्येयाने काम करत असल्याने त्यांचे सर्वच प्रकल्प इतरांपेक्षा वेगळे ठरत असल्याचे बोलले जात आहे.

अलिशानतेची परिभाषा बदलणाऱ्या सुख सोयी, नाविन्यपूर्ण डिझाइन्स मधील बारकावे, आर्किटेक्चरल रचनांमधील भव्यता यामुळे परंपरा आणि नावीन्य याचा सुरेख मिलाफ त्यांच्या प्रकल्पांमध्ये पाहायला मिळतो असे ग्राहक आवर्जून नमूद करतात. यामुळेच केवळ घराचे बांधकाम करून त्याची विक्री करण्यापेक्षा, ग्राहकांच्या शाश्वत आनंदाचे, सुखाचे, समाधानाचे 'नंदनवन' फुलवणारी एक अद्वितीय वास्तू निर्माण करण्याकडे व्हीटीपी चा आग्रह असल्याने, ग्राहकाभिमुख बांधकाम व्यावसायिक म्हणून दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून येते!

व्हीटीपी रिअल्टी: उत्कृष्टतेचे शाश्वत ठिकाण !

'दुसरी दिवाळी - व्हीटीपी वाली 2024' बद्दल अधिक माहितीसाठी भेट द्या: www.vtprealty.in

Online Media Coverage Links

flower
vtp realty
whatsapp